3 August  Rashifal : धनु आणि कुंभसह या तीन राशीच्या लोकांना नवीन कार्यासाठी दिवस शुभ, जाणून घ्या दैनिक भविष्य

नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे भविष्य सांगतात. दैनिक राशिफळ (Dainik Rashifal) हे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित एक जन्मकुंडली आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) दैनंदिन अंदाज स्पष्ट केले जातात. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभर घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे भाकीत करते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. उदाहरणार्थ, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली सांगते की आजचे तुमचे ग्रह-तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हे समजू शकते. दैनंदिन कुंडली वाचून, तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी (संधी आणि आव्हाने) तयार राहू शकता.

मेष (Aries Daily Horoscope)   
आजचा दिवस सामान्य आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. त्यांच्यासोबत पार्टी करण्याची योजना बनवू शकता. दूरच्या प्रवासाला जात असाल तर एखाद्या नातेवाईकाशी काळजीपूर्वक बोला. काम सोडून मन इतर कामात व्यस्त राहील, त्यामुळे काम लटकू शकते. कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करू शकता.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस व्यस्त आहे. व्यस्ततेमुळे कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाही. ज्यामुळे ते नाराज होतील. कुटुंबातील लोक बोलण्याला आदर करतील. व्यवसायात मोठी डील हाताबाहेर जाऊ शकते. संततीच्या प्रगतीमधील अडथळे दूर होतील. मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे कुटुंबात छोटी पार्टी आयोजित कराल. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबाबत चिंता राहील.

मिथुन (Gemini Daily Horoscope)
दिवस चढ-उताराचा आहे. व्यवसायातील डीलची चिंता दूर होऊन ती पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत दिनचर्येत योगासनांचा अवलंब करा. शारीरिक त्रासांवर मात कराल. व्यवसायात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा पश्चाताप होईल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे मित्रांची संख्या वाढेल.

कर्क (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस लाभदायक आहे. कामासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. राजकारणात प्रयत्न करू शकता. कौटुंबिक मतभेदांपासून दूर राहा. जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल. समस्यांबद्दल काळजी वाटत असेल, तर ज्येष्ठ सदस्यांशी बोलू शकता. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळेल.

सिंह (Leo Daily Horoscope)

भांडणांमध्ये अडकल्यामुळे दिवस त्रासदायक ठरेल. कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. कामाच्या ठिकाणी भांडण टाळा. परंतु मुद्दा वरिष्ठांसमोर ठेवा. कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करू शकाल. कोणालाही न मागता सल्ला देणे टाळा.

कन्या (Virgo Daily Horoscope)
दिवस संमिश्र आहे. जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे चिंतेत असाल. आरोग्याच्या समस्यांबद्दल काळजी वाटेल. त्रास कमी होईल. एखाद्या गोष्टीमुळे अस्वस्थ व्हाल. विद्यार्थ्यांना परीक्षेतील अडचणींसाठी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित मौन बाळगा. फिरताना महत्त्वाची माहिती मिळेल.

तूळ (Libra Daily Horoscope)
दिवस खास आहे. भागीदारीत नवीन काम करणे चांगले राहील. धार्मिक यात्रेला जाताना आई-वडिलांना सोबत घेऊन जा. एखाद्या खास व्यक्तीला भेटल्यानंतर मन उदास होईल. संतती अपेक्षा पूर्ण करेल. जुन्या चुकीबद्दल पश्चाताप होऊ शकतो. विद्याथ्र्यांचे अभ्यासात लक्ष विचलित होऊ शकते. परीक्षेच्या तयारीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

नवीन वाहन खरेदीसाठी दिवस चांगला आहे. आई-वडिलांच्या तब्येतीबद्दल जागरूक राहा. नोकरीत प्रमोशन मिळेल. त्यामुळे प्रगतीत भर पडेल. मालमत्तेचे व्यवहार करण्याची संधी मिळेल. ज्यात बुद्धीने आणि विवेकबुद्धीने निर्णय घ्या. अन्यथा समस्या उद्भवू शकते. विद्याथ्र्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. नोकरीत वरिष्ठांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. अन्यथा चूक होऊ शकते.

धनु (Sagittarius Daily Horoscope)  
व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. कामात सहकार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
कौटुंबिक समस्यांमुळे मन थोडे अस्वस्थ राहील. जेष्ठ सदस्यांच्या मदतीने अस्वस्थता दूर होईल.
तब्येत बिघडल्याने त्रास होईल. डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा नंतर मोठी समस्या उद्भवू शकते.
संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. न मागता कोणालाही सल्ला देणे टाळा.

मकर (Capricorn Daily Horoscope)
आजचा दिवस समस्यांचा आहे. व्यवसायात मनमानीमुळे नुकसान होईल.
ज्यामुळे अस्वस्थ राहाल. तणाव वर्चस्व गाजवेल. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.
कुटुंबातील सदस्य नोकरीसाठी घरापासून दूर जाऊ शकतो.
दूरच्या नातेवाईकाकडून अप्रिय बातमी ऐकायला मिळेल. कामासाठी प्रवासाला जाताना सावध वाटचाल करा.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आजचा दिवस संमिश्र आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळू शकते.
ज्यामुळे अनेक समस्या दूर होतील. धार्मिक यात्रेला जातातना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा.
अन्यथा हरवण्याची किंवा चोरीची भीती आहे. कामे पूर्ण होतील.
सरकारी नोकरी संदर्भात चांगली बातमी ऐकायला मिळेल.
संततीच्या मनात चाललेल्या गोंधळाबाबत बोलावे लागेल. अन्यथा दोघांमध्ये खूप अंतर होईल.

मीन (Pisces Daily Horoscope)
कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.
परंतु अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल.
मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता.
मालमत्तेशी संबंधित वाद कायद्यात चालू असेल तर विजय होईल. मालमत्ता मिळेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | महिलांवरील अत्याचार हा गंभीर आणि चिंताजनक विषय, पण विरोधकांचे आरोप बिनबुडाचे – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)