पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला लागणार झटका ! जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी सामान्य माणसाच्या समस्या आणखीणच वाढवून ठेवल्या आहेत. सरकारी कंपन्या इंडियन ऑइल (IOC ), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ केली. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 10 पैसे प्रति लीटर इतकी वाढ झाली आहे. मागील पाच दिवसात सलग पेट्रोलच्या दरात कधी करण्यात आली होती. तर डिझेलची किंमत स्थिर होती. आज दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव 81.83 रुपये तर डिझेलचा भाव 73.56 रुपये प्रति लीटर इतका आहे. रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात.

या कारणामुळे वाढतात पेट्रोल-डिझेलचे दर

आंतरराष्ट्रीय इंधन बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेल्या बदलाचा परिणाम देशातील बाजारावरही झालेला दिसून येतो. विदेशी चलनासोबत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलांच्या किंमती किती आहेत त्या आधारावर रोज पेट्रोल-डिझेलचे दर ठरवले जातात. पेट्रोल-डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन जोडल्यानंतर याचे दर जवळजवळ दुप्पट होतात.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली – पेट्रोल 81.83 आणि डिझेल 73.56 रुपये प्रति लीटर आहे.

मुंबई- पेट्रोल 88.48 आणि डिझेल 80.11 रुपये प्रति लीटर आहे.

कोलकाता- पेट्रोल 83.33 आणि डिझेल 77.06 रुपये प्रति लीटर आहे.

चेन्नई – पेट्रोल 84.82 आणि डिझेल 78.86 रुपये प्रति लीटर आहे.

नोएडा – पेट्रोल 82.12 आणि डिझेल 73.87 रुपये प्रति लीटर आहे.

गुरुग्राम – पेट्रोल 79.99 आणि डिझेल 74.03 रुपये प्रति लीटर आहे.

लखनऊ – पेट्रोल 82.07 आणि डिझेल 73.77 रुपये प्रति लीटर आहे.

पटना – पेट्रोल 84.40 आणि डिझेल 78.72 रुपये प्रति लीटर आहे.

जयपूर – पेट्रोल 89.02 आणि डिझेल 82.62 रुपये प्रति लीटर आहे

अशा प्रकारे चेक करा तुमच्या शहरातील रेट्स

रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात. हे दर तुम्ही SMS द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ओईलचे ग्राहक RSP टाइप करून 9224992249 नंबर वर आणि बीपीसीएल उपभोक्ता RSP टाइप करून 9223112222 या नंबरवर पाठवून माहिती मिळवू शकतात. एचपीसीएल च्या दारांची माहिती HPPrice लिहून 99222201122 या नंबरवर SMS पाठवून माहिती मिळवू शकतात.