आज पुणे-मुबंई द्रुतगती मार्ग दोन तासांसाठी बंद राहणार 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आज गुरुवार दिनांक ६ रोजी १२ ते २ या वेळेत मुंबई -पुणे महामार्ग बंड करण्यात येणार आहे . या द्रुतगती मार्गावर दिशेची मार्गिका लावण्यात येणार आहे त्यामुळे हा मार्ग दोन तासांकरिता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’208634da-b1a0-11e8-846b-fbd45a6d398c’]
द्रुतगती मार्गावर सूचना फलक लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.पर्यायी मार्ग म्हणून जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक वळवण्यात आली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी किंवा प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही.

जाहिरात

एक्सप्रेस वे वर १० गाड्या एकमेकांना धडकल्या

वाहतूक जुन्या मुबंई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येणार
हा बंद फक्त आज गुरुवारी एकदाच  दोन तासांकरिता बंद असेल अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.त्यामुळे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे. आज केवळ मुंबई-पुणे मार्गावरील आणि गणपती उत्सवानंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच ब्लॉक घेऊन,सूचना फलक बसवले जाणार आहेत. द्रुतगतीवरील बोरघाटात अथवा कोठेही वाहतूक कोंडी झाल्यास,पर्यायी मार्गजवळच प्रवाश्यांना तश्या सूचनासह अनेक फलक लागणार आहेत.