आरती कोंढरेंवर कारवाई न केल्यास उद्या डॉक्टरांचे काम बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ससूनमध्ये डॉक्टरला मारहाण केल्याप्रकऱणी भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांच्यावर डॉक्टर प्रोटेक्शन अक्टनुसार कारवाई केली नाही तर काम बंद ठेवण्याचा इशारा मार्डकडून देण्यात आला आहे. यासंदर्भात मार्डकडून ससूनच्या अधिष्ठातांना पत्र देण्यात आले आहे.

ससूनमधील निवासी डॉक्टर स्नेहल खंडागळे यांना मंगळवारी मध्यरात्री भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांनी मारहाण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती कोंढरे यांनी वॉर्ड क्रमांक ४३ मधील एका रुग्णावर उपचार करत असताना स्नेहल खंडागळे यांना तातडीने उपचार करण्यास सांगितले होते.

त्यानंतर त्यांनी प्राथमिक उपचार केले असल्याचे सांगत त्याला सीटी स्कॅनसाठी न्यायचे आहे असे सांगितले. त्यावेळी कोंढरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देत त्याचे मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करण्यास सुरुवात केली. त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यावर माराहण करून बघून घेण्याची धमकी देत निघून गेल्या. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र त्यांच्यावर लवकरात लवकर डॉक्टर्स प्रोटेक्शन अक्टअंतर्गत चोवीस तासात कारवाई नाही केल्यास शुक्रवारी (दि. १५) काम बंद ठेवणार असल्याचा इशारा मार्डकडून देण्यात आला आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पुल कोसळला ; ४ जणांचा मृत्यू ३४ जखमी मयतांची नावे आणि इतर माहिती वाचा सविस्तर

पुणे विमानतळावर ३० लाखांचे सोने जप्त

हे तर मोदींच्या झुला डिप्लोमसीचे अपयश : असदुद्दीन ओवेसी

कुठे नेउन ठेवलयं पुणे ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like