Top-5 Penny Stocks 2023 | रु. १० पेक्षा कमीचे हे ५ शेअर तुम्हाला बनवू शकतात करोडपती, खरेदी करण्यापूर्वी वाचा माहिती

नवी दिल्ली : पेनी स्टॉकमध्ये (Top-5 Penny Stocks 2023) पैसे लावून तुम्ही कमी वेळात लखपतीपासून करोडपती बनवू शकतात. जर कंपनीच्या कामकाजात भविष्यात वाढीची शक्यता असेल तर तुम्ही मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Returns) प्राप्त करू शकता. (Top-5 Penny Stocks 2023)

भारतात १० रुपयांपेक्षा कमीच्या शेअरला पेनी स्टॉक म्हणतात. जर लाँग टर्मसाठी पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक (Investment) करण्याची जोखीम घेऊ शकत असाल तर ते तुम्हाला भरपुर कमाई करून देऊ शकतात.

आज आपण अशा ५ पेनी स्टॉकबाबत जाणून घेणार आहोत जे आगामी काळात मालामाल करू शकतात. मात्र, अतिशय जोखमीच्या या शेअर्समध्ये पैसे लावण्यापूर्वी एखाद्या मार्केट एक्सपर्टचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे.

जय प्रकाश पॉवर व्हेंचर (Jai Prakash Power Ventures) :
१० रुपयांपेक्षा कमीच्या शेअरमध्ये जयप्रकाश पॉवर व्हेंचर सुद्धा एक असा शेअर आहे, जो आगामी काळात १०० ते २०० टक्केपर्यंत रिटर्न देऊ शकतो. मागील ५ दिवसात हा स्टॉक ७.१९ टक्के वाढला आहे. शुक्रवारी २.५० टक्केच्या वर ८.२० रुपयांवर बंद झाला होता. त्याचा ५२ आठवड्याचा उच्चांक ९.४५ रुपये आणि निचांक ५.१५ रुपये आहे. (Top-5 Penny Stocks 2023)

रत्तन इंडिया पॉवर लिमिटेड (Rattan India Power Limited) :
हा स्टॉक १० रुपयांपेक्षा कमी आहे आणि ५ दिवसात २८.४४ टक्क्यांची लांब उडी घेत ७ रुपयांवर पोहचला आहे. त्याचा ५२ आठवड्याचा उच्चांक ७.१५ रुपये आणि लो २.८० आहे. एक महिन्यात त्याने ४२.८६ टक्केचा जबरदस्त रिटर्न दिला आहे. मागील सहा महिन्याबाबत बोलायचे तर त्याने १०० टक्के रिटर्न देऊन गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर (GTL Infrastructure) :
जीटीएल इन्फ्राचा शेअर शुक्रवारी ७ टक्केपेक्षा जास्त वाढला होता. त्याच्या एका शेअरचे मुल्य एका माचिसच्या पेटीपेक्षा कमी आहे. अवघ्या ७५ पैशांच्या या शेअरमध्ये एक्सपर्ट १०० ते २०० टक्केची शक्यता पहात आहेत. त्याचा ५२ आठवड्याचा उच्चांक १.८० रुपये आणि निचांक ६० पैसे आहे.

विकास लाईफ केअर लिमिटेड (Vikas Life Care Limited) :
या पेनी स्टॉकची किंमत ५ रुपये प्रति शेअरपेक्षा सुद्धा कमी आहे.
शुक्रवारी २.२७ टक्केपेक्षा खाली बंद झालेल्या या शेअरची किंमत ४.३० रुपये आहे.
त्याचा ५२ आठवड्याचा उच्चांक ५.४० रुपये आहे आणि निचांक २.७० आहे.
मागील ५ दिवसात त्याने १६ टक्के रिटर्न दिला आहे.
मागील सहा महिन्यातील त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर या स्टॉकने ४०.९८ टक्केचे उड्डाण घेतले आहे.

वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) :
टेलीकॉम सेक्टरमधील (Telecom Sector) या कंपन्यांचा एकेकाळी खासगी ऑपरेटर्समध्ये दबदबा होता.
कर्जात बुडालेल्या या कंपनीचे नशीब अधांतरी आहे.
मात्र, आता कंपनीच्या काही निर्णयांमुळे तिचा शेअर १० रुपयांच्या पुढे गेला आहे.
शुक्रवारी वोडाफोन-आयडियाचा शेअर ११.०५ टक्के उसळी घेत १०.०५ रुपयावर बंद झाला होता.
तो आपल्या ५२ आठवड्याच्या निचांक ५.७० रुपयांच्या सुमारे दोन पट आहे.
मागील ५ दिवसातच तो १७.५४ टक्के वाढला आहे. एक्सपर्टना सध्या यामध्ये १०० टक्के वाढीची शक्यता दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | MBA ची प्रवेश परिक्षा पास करुण देण्याची हमी देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune Crime | वकील महिलेकडे खंडणी मागणार्‍या दोघा सराईतांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

PM Kisan | लवकर दुरूस्त करा आपले नाव आणि आधारसंबंधी चुका, ‘या’ दिवशी येईल PM Kisan चा 10वा हप्ता