कामाची गोष्ट ! Aadhaar च्या मदतीनं फक्त 10 मिनिटांमध्ये बनेल तुमचं Pan Card, अर्थ मंत्र्यांनी सुरू केली सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुमच्याजवळ आधार आहे आणि युआयडीएआयच्या डाटाबेसमध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे, तर तुमचे पॅनकार्ड झटपट तयार होऊ शकते. पॅनकार्ड तात्काळ मिळण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गुरुवारी या सुविधेची औपचारिक सुरूवात केली आहे. पॅनकार्ड बनवण्याच्या या प्रक्रियेची सर्वात मोठी खासियत ही आहे की, यामध्ये वेळ लागत नाही आणि सुविधा मोफत आहे. या प्रक्रियेतून मिळणार्‍या पॅनकार्डला ई-पॅन असे नाव दिले आहे.

सध्या तात्काळ पॅन जारी करण्यासाठी आधारवर आधारित ई-पॅन ला गुरूवारी औपचारिक पद्धतीने लाँच करण्यात आले, परंतु इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग वेबसाइटवर बीटा व्हर्जनची ट्रायल फेब्रुवारीपासूनच सुरू होती.

पीटीआयनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने आपल्या वक्तव्यात म्हटले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅन तात्काळ मिळण्याची ही सुविधा औपचारिक पद्धतीने गुरुवारी लाँच केली. याच्या बीटा व्हर्जनची ट्रायल 12 फेब्रुवारीपासून सुरू होती. तेव्हापासून 25 मेपर्यंत 6,77,680 तात्काळ पॅन वाटप करण्यात आले आहेत. पॅनकार्डसाठी अर्ज करणे ते वाटप होण्यापर्यंत 10 मिनिटांचा वेळ लागतो.

पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, 25 मे 2020 पर्यंत करदात्यांना 50.52 करोड पॅनकार्डचे वाटप करण्यात आले आहे. यापैकी व्यक्तीगत 49.39 करोड पॅनचे वाटप करण्यात आले आहे. तर 32.17 करोडपेक्षा अधिक पॅन हे आधार लिंक्ड आहेत. पॅन-आधार लिंकिंगची शेवटची तारिख 30 जून 2020 आहे.

तात्काळ पॅनसाठी असा करा अर्ज

ई-पॅनसाठी अर्जदाराला इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जावे लागेल. तेथे त्यांना आपला आधार नंबर टाकावा लागेल. ज्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. यशस्वीपणे ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 15 अंकांचा एक एक्नॉलेजमेंट नंबर येईल. याद्वारे तुम्ही आपल्या पॅनच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. पॅन तयार झाल्यानंतर आपण ते डाऊनलोड सुद्धा करू शकता. सीबीडीटीनुसार, तयार झाल्यानंतर पॅनकार्ड अर्जदाराला ईमेलद्वारे सुद्धा पाठवले जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like