आमदार प्रताप सरनाईक यांना ED चा तिसऱ्यांदा समन्स

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – टॉप्स ग्रुप प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) तिस-यांदा समन्स बजावले आहे. यापूर्वी दोन वेळा त्यांना समन्स बजावला होता. पण ते चौकशीला उपस्थित राहिले नाहीत.
मनी लॉ़ड्रिंगच्या संशयावरून दिल्लीतून आलेल्या विशेष पथकाने प्रताप सरनाईक यांच्या घरासह 10 ठिकाणी छापे टाकले होते.

त्यानंतर ईडीने त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची देखील चौकशी केली होती. त्यानंतर पत्नीची प्रकृती बिघडल्याने विहंग सरनाईक रुग्णालयात होते. त्यामुळे ते चौकशीला हजर नव्हते. पदेशातून आलेले प्रताप सरनाईक हे होम क्वारंटाईन झाले होते. त्यामुळे ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाहीत. गुरुवारी त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीची शक्यता आहे. मुंबईतील सर्व उड्डाण पुलावर सुरक्षारक्षक आणि ट्राफिक मार्शल पुरवण्याचे एमएमआरडीएचे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले होते. यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आ. सरनाईक यांचे नाव पुढे आल्याने त्यांना ईडीने समन्स बजावले आहे.