शिरूर मतदारसंघात पाचर्णे Vs पवार चुरशीची लढत ! निकाल काही तासांवर

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नुकतंच यासाठी मतदान पार पडलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी महिला विरुद्ध पुरुष असा सामना दिसत आहे. काही ठिकाणी तिरंगी लढतही पाहायला मिळत आहे. इतर ठिकाणी टफ फाईट होतानाही दिसत आहे. शिरुर विधानसभा मतदारसंघातही चुरशीची लढाई होताना दिसत आहे.

शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. अशोक पवार आणि भाजपकडून बाबूराव पाचर्णे निवडणुकीच्या रिंगणात आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत बाबूराव पाचर्णे यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांचा पराभव करत ही जागा आपल्या ताब्यात घेतली होती. बाबूराव पाचर्णे यांनी 10941 मतांनी अशोक पवारांचा पराभव केला होता.

बाबूराव पाचर्णे यांनी आतापर्यंत 5 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यात त्यांचा 3 वेळा पराभव झाला तर 2 वेळा ते विजयी झाले आहेत. विधानसभेसाठी त्यांनी जोरदार तयारी आणि प्रचार केला आहे. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही प्रचारादरम्यान शिरुरमध्ये आले होते. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते.

राष्ट्र्वादीचे उमेदवार आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या बद्दल सांगायचे झाले तर मागील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी तालुक्यातील जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. विधानसभेच्या दृष्टीने त्यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यांच्या पत्नी सुजाता पवार या जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती आहेत. पवारांचे घोडगंगा सारखर कारखान्यावर एकहाती वर्चस्व आहे.

दरम्यान शिरूर मतदारसंघात 67.21 टक्के मतदान पार पडलं आहे. दुपारनंतरही अनेक मतदारांनी रांगेत उभं रहात शांततेत मतदान केलं. एकंदरीत पाहता दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने जोरदार लढत दिली आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि उमेदवार विजयी होण्याचा दावा करत आहेत. त्यामुळे शिरुरमध्ये कोणाचं पारडं जड ठरतंय तसेच शिरूरमध्ये पुन्हा कमळ फुलतंय की घड्याळाचा गजर होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like