पुण्यात ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चिखली, मोरेवस्ती येथे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली. सुनील भागवत शिंदे (२२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय भागवत शिंदे (३४, रा. चिखली. मूळ रा. मिरगवन, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुनील मोरेवस्तीमधील अंगणवाडी कॉलनीतून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सुनीलला धडक दिली. यामध्ये सुनील गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सध्या ट्रकचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.