Traffic New Rules | ‘रॅश ड्रायव्हिंग’ अन् भरधाव वाहने चालविणार्‍यांनी व्हावं सावध ! ‘या’ नवीन सिस्टमध्ये ‘तात्काळ’ कापले जाईल ‘चलान’ आणि रद्द होईल ‘DL’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Traffic New Rules | तुम्ही सुद्धा रस्त्यावर गाडी वेगाने चालवत असाल तर सावध व्हा. रस्ते दुर्घटना नियंत्रित करण्यासाठी आता पोलीस नवीन (Traffic New Rules) पाऊल उचलत आहेत. आता वेगावान गाड्या रोखण्यासाठी अथॉरिटीज आणि पोलीस रस्ते आणि हायवेवर स्पीड डिटेक्टिंग कॅमेरे (speed detection cameras) लावत आहे. म्हणजे आता जर तुम्ही वेगाने गाडी चालवली तर ती कॅमेर्‍यात कैद होईल आणि तुमच्यावर कारवाई होईल.

हे हायटेक कॅमेरे (high-tech cameras) कायमस्वयपी पोलवर लावले जातील. या दरम्यान जर एखादी गाडी वेगाने गेली तर स्पीड कॅमेरा तिचा शोध घेऊन पोलिसांना माहिती देईल. यांचा वापर रस्त्यावर कुठेही करता येऊ शकतो.

कुठे आणि कसे लावले आहेत हिडन कॅमेरे?
दिल्ली-हरियाणा रस्त्यावर (Delhi-Haryana road) ही सिस्टम लावली आहे. येथे पोलिसांनी गाडीच्या पाठीमागे स्पीड डिटेक्शन सिस्टम (speed detection system) लावली आहे. कॅमेर्‍याच्या मदतीने वेगाने जाणार्‍या गाडीचा स्पीड जाणून घेवून तिला रोखले जात आहे आणि चलन फाडले जात आहे. स्पीड ट्रॅप कॅमेरा (Speed trap camera) पोलिसांनी मारुती सुझुकी अर्टिंगामध्ये लावला आहे. या दरम्यान एक ऑपरेटर सतत हा कॅमेरा चालवतो.

2000 रुपयांचे चलन आणि डीएल सुद्धा होणार रद्द (Rs 2,000 challan and DL will also be canceled) ऑपरेटर गाडीचा वेग जास्त असल्याचे ओळखतो आणि वरिष्ठांना गाडी रोखण्याचे निर्देश देतो. यानंतर अधिकारी वेगाने जाणार्‍या गाडीच्या ड्रायव्हरला 2000 रुपयांचा दंड करतात. याशिवाय त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द करू शकतात.

कसे काम करतो स्पीड ट्रॅप कॅमेरा?
हा कॅमेरा रडार तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा कॅमेरा कोणत्याही गाडीचा स्पीड ओळखण्यासाठी डॉप्लर इफेक्ट (Doppler effect)चा वापर करतो.
हा रडार कॅमेरा रेडियो वेव्हज सोडतो (radar camera emits radio waves) ज्या स्पीड ऑफ लाइटने प्रवास करतात.
रेडियो वेव्ह गाडीवर आदळतात. आदळल्यानंतर त्या परत सिस्टमकडे येतात जिथे याचा रियल टाइम कॅलक्युलेट होतो.

 

लेझर गनप्रमाणे काम करते

ही सिस्टम लेझर गनसारखीच काम करते (system works just like a laser gun).
परंतु लेझर गन खुप जास्त महाग असतात.
मॉडर्न रडार आधारित सिस्टम ANPR म्हणजे ऑटोमेटिक नंबर प्लेट रेकग्निशन सिस्टम (automatic number plate recognition system) सोबत येते.
ती गाडी नंबरसुद्धा नोट करते. अशावेळी हे स्पष्ट होते की, या सिस्टम्स आल्यानंतर पोलीसांना खुप मदत होणार आहे,
तर चालकांना खुप सावध राहावे लागणार आहे. (Traffic New Rules)

Web Title :- Traffic News Rules | traffic new rules driving fast car on roads be careful police setting up speed trap cameras know here detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Earn Money | नोकरी करणारे 10 हजारात सुरू करू शकतात ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल 30000 ची जादा कमाई, जाणून घ्या कशी

Petrol Diesel Price Hike | इंधन दरात सलग चौथ्या दिवशी वाढ ! पेट्रोल 25 तर डिझेल 30 पैशांनी महागले

NCB Drugs Raid | NCB नं ताब्यात घेतलेल्या शाहरूख खानच्या मुलाचा पहिला व्हिडीओ आला समोर; आर्यनचा जबाब नोंदवला (व्हिडिओ)