ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

Petrol Diesel Price Hike | इंधन दरात सलग चौथ्या दिवशी वाढ ! पेट्रोल 25 तर डिझेल 30 पैशांनी महागले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल 80 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. त्यामुळे इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या चार-पाच दिवसापासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. आठ दिवसात पेट्रोल 1.20 रुपये तर डिझेल 2.15 रुपयांनी महागले आहे. दरम्यान रविवारीही पेट्रोलियम कंपन्यांनी तेलाच्या दरात वाढ केली असून पेट्रोल 25 पैसे, तर डिझेल 30 पैशांनी महागले आहे. (Petrol Diesel Price Hike)

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलमध्ये 25 पैसे आणि डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ केली होती. या दरवाढीचा परिणाम म्हणजे भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव 110 रुपयांवर गेला होता. शुक्रवारी पेट्रोल दरात 25 पैसे आणि डिझेलमध्ये 30 पैसे वाढ करण्यात आली. शनिवारीही पेट्रोल दर 20 पैसे आणि डिझेल दर 25 पैशांनी वाढवले होते.

जाणकारांच्या मते, पुरवठा मर्यादित असून युरोपात तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तेलदराचा भडका उडण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर शहरांच्या तुलनेत उच्चांकावर आहेत.

रविवारी करण्यात आलेल्या दरवाढीनंतर प्रमुख शहरात वाढलेले पेट्रोल-डिझेल मागले असून चेन्नईत पेट्रोल शंभरीत तर भोपाळमध्ये डिझेल शंभरीच्या जवळ पोहोचले आहे.

प्रमुख शहरात वाढलेले इंधन दर (प्रतिलिटर)

 

शहर  पेट्रोल  डिझेल

पुणे :- 107.95 रु.  96.50 रु

मुंबई :- 108.43 रु.  98.48 रु.

दिल्ली :- 102.39 रु.  90.77 रु.

चेन्नई :- 100.01 रु.  95.31 रु.

कोलकाता :- 103.07 रु.  93.87 रु.

भोपाळ :- 110.88 रु.  99.73 रु.

बंगळुरू :- 105.95 रु.  96.34 रु.

Web Title :- Petrol Diesel Price Hike | petrol price hike 25 paise and diesel hike 30 paise know today latest fuel rate india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCB Drugs Raid | NCB नं ताब्यात घेतलेल्या शाहरूख खानच्या मुलाचा पहिला व्हिडीओ आला समोर; आर्यनचा जबाब नोंदवला (व्हिडिओ)

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या नराधमाकडून भर रस्त्यात 17 वर्षाच्या मुलीशी अश्लील भाषा अन् ‘विनयभंग’

Japanese Towel Exercise | 5 मिनिटांची ‘जपानी टॉवेल एक्सरसाईज’ केल्याने होतील फ्लॅट अ‍ॅब्ज, 10 दिवसात चमत्कार !

Back to top button