home page top 1

#Video : १५ वर्षाच्या मुलाचा ‘संघर्ष’ सांगणाऱ्या ‘NOBELMEN’चा ट्रेलर ‘रिलीज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड मधील नोबेलमेन या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा २८ जून रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर तर दमदर दिसत आहे. हा सिनेमा इंग्रजीत असून याचे दिग्दर्शन वंदना कटारिया यांनी केले आहे. या सिनेमात कुणाल कूपर, अली हाजी, मोहम्मद अली मीर, इवान रोड्रिग्स, अंकित कुक्ती, शान ग्रोवर, मुस्काकैन जॅफी, मनस्वी सहित इतरही अनेक कलाकार आहेत.

ट्रेलर रिव्ह्यु-

या सिनेमात मानव चौहान, अभय नारंग आणि पराग गुप्ता हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर पाहून लक्षात येतं की, या सिनेमातील स्टोरी ही एका १५ वर्षांच्या मुलाबद्दल आहे, जो आपल्या किशोरावस्थेतील वर्षांसोबत सुरु असलेल्या संघर्षाचा सामना करत आहे. बोर्डिंग स्कुलमध्ये राहणाऱ्या या मुलाला त्याच्या सिनीयर्सकडून त्रास दिला जातो. यामुळे तो खूपच उदास झालेला आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येतं की, हा सिनेमा म्हणजे एक सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. या सिनेमाची निर्मिती युडली फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे, जो सारेगामाचं प्रॉडक्शन व्हेंचर आहे. २८ जून रोजी हा सिनेमाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नोबेलमेन या सिनेमाच्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांना हा ट्रेलर आवडला आहे. असेही दिसत आहे. हा ट्रेलर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवताना दिसत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Loading...
You might also like