राज्यातील ४ पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (DIG) बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाने चार पोलीस उपमहानिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक यांची ठाणे शहर पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली केली आहे. तर त्या जागी असलेले पी़ आर दिघावकर यांची मुंबईतील महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे पोलीस उप महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन परत राज्यात आलेले जयंत नाईकनवरे यांची मुंबईत दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उप महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची पदोन्नतीवर मुंबईत विक्रीकर (वस्तू व सेवा कर)च्या पोलीस उपनिरीक्षकपदी बदली केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील १० आईपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या 
IPS तेजस्वी सातपुते साताराच्या नव्या पोलीस अधीक्षक 
इशू सिंधू नगरचे नवीन एस.पी., शर्मा यांची नागपूर सीआयडीला बदली 

विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह ६ विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) बदल्या 

राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या