राज्यातील 4 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय प्रशाकीय सेवेतील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या आज (16 जानेवारी) बदल्या करण्यात आल्या आहेत. या सनदी अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारमध्ये अल्पसंख्यांक विकास विभाग, वस्त्रोद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वन विभाग या 4 विभागात नव्याने नियुक्त्या झाल्या आहेत.

1. श्रीमती जे मुखर्जी यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय, मुंबईत करण्यात आली आहे. ते यापूर्वी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंडळात कार्यरत होते.
2. श्री बी वेणुगोपाल रेड्डी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ यांची बदली प्रधान सचिव वन विभागात करण्यात आली आहे.
3. श्री एस.ए. तागडे, प्रधान सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग यांची बदली प्रधान सचिव वस्त्रोद्योगात करण्यात आली आहे.
4. डॉ. के. एच. गोविंदराज प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे करण्यात आली आहे.

याआधी 9 डिसेंबर 2019 ला राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर आज पुन्हा एका 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/