राज्य पोलीस दलातील 5 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलिस (police) आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश आज (शुक्रवार) गृहविभागाने काढले. यात पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर प्रशांत अमृतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील हे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू आहेत.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे
1. राजाराम रामराव पाटील – (सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर उपविभाग, कोल्हापूर)
2. रोशन पंडीत – (पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) अहमदनगर ते सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर)
3. प्रशांत अमृतकर – (उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर उपविभाग, कोल्हापूर ते सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड
4. शशिकांत काशिद – (उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब उपविभाग, उस्मानाबाद ते उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड उपविभाग, रत्नागिरी)
5. भारत काकडे – (अप्पर पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती ते उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा उपविभाग, जळगाव)

तसेच यतिश देशमुख (भापोसे) यांची उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर पदावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापूर येथे करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे. तर उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभाग जळगाव ईश्वर कातकडे यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.