महिला आध्यात्मिक गुरु कडून आशीर्वाद घेणे पोलिसाला पडले महागात

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोठमोठे मंत्री, सेलिब्रेटी, अधिकारी कोणत्या ना कोणत्या आध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत असल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो. पण ऑन ड्युटी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने महिला अध्यात्मिक गुरु कडून घेतलेला आशीर्वाद  त्याला चांगलाच महागात पडला आहे. या अध्यात्मिक गुरूचा आशीर्वाद घेत असल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोवरून  या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’123263d2-8e75-11e8-88ac-0766ddb30245′]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या व्हायरल झालेल्या फोटोत दिल्ली येथील जनाकपुरी पोलीस स्टेशनचे एसएचओ इंद्रपाल हे संपूर्ण खाकी  गणवेशात खुर्चीवर बसले आहेत, तसेच अध्यात्मिक गुरु नमिता आचार्य इंद्रपाल यांच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद देत असल्याचा हा फोटो आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमुळे आता पोलीस अधिकारी इंद्रपाला यांची पोलीस लाईनमध्ये बदली झाली असून याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीतील वर्तुळात नमिता आचार्य ही हाय प्रोफाइल महिला अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखाली जाते. अनेक नोकरशहा आणि आयपीएस अधिकारी नमिता आचार्य यांच्या दरबारात येऊन गेले आहेत.

जाहिरात