राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलान – राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांची बीडचे अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. नाशिक येथील राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त सुनिल कडासने यांची नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची चंद्रपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. चंद्रपूरचे अप्पर अधीक्षक हेमराज राजपूत यांची बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांची अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. धुळे येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ६ चे समादेशक सचिन गोरे यांची जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील १० आईपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या 
IPS तेजस्वी सातपुते साताराच्या नव्या पोलीस अधीक्षक 
इशू सिंधू नगरचे नवीन एस.पी., शर्मा यांची नागपूर सीआयडीला बदली 

विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह ६ विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) बदल्या 
राज्यातील ४ पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (DIG) बदल्या