राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सात आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही महिन्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये एस चोकलिंगम, श्रावण हर्डीकर, शितल उगले-तेली यांच्यासह सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

जमावबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे एस चोकलिंगम यांची बदली यशदा पुणे महासंचालक पदावर करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ओडिसा केडरचे राजेश पी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच शितल उगले-तेली यांची नागपूरला बदली झाली असून त्यांची नियुक्ती संचालक, वस्रोद्योग पदावर करण्यात आली आहे. पुण्यात अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त असलेल्या प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती वर्धाच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.

पनवेल भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमि अभिलेखमध्ये असलेल्या अनिता पाटील यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन राज्य शासनाकडे रुजू झालेले एन के सुधांशु यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर करण्यात आली आहे.