पुणे : ‘ट्रिपल तलाक’ कायद्याच्या भीतीने पत्नीला कौटुंबिक न्यालयातच मारहाण

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

ट्रिपल तलाक कायदा अस्तित्वात आला तर जेलमध्ये जाण्याच्या भितीने पतीने कौटुंबीक न्यायालयातील खटला मागे घेण्याचा दबाव पत्नीवर टाकून मारहाण केली. हा प्रकार शिवाजीनगर येथील कौटुंबीक न्यायालयात मंगळवारी (दि.१९) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहेल लतीफ खान पठाण (रा. सॅनपॅट्रीक काटाऊन सोसायटी, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी अरविन सोहेल पठाण खान (रा. सबेरा पॅलेस मोमीनपुरा) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोहेल आणि अरविन यांच्यामध्ये कौटुंबीक वाद असून या प्रकरणाची खटला शिवाजीनगर कौटुंबीक न्यायालयात सुरु आहे. अरविन यांनी कौटुंबीक न्यायालयात सोहेल विरोधात पोटगीची खटला दाखल केली आहे. मंगळवारी या खटल्याची तारीख असल्याने दोघेही कौटुंबीक न्यायालयात आले होते. ट्रिपल तलाक कायदा अस्तित्वात आला तर मी जेलमध्ये जाईल त्यामुळे तू हा खटला मागे घेण्यास सांगून पत्नी अरविनला मारहाण केली. तसेच सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर टाकून तिला जखमी केले. कौटुबीक न्यायालयातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. जखमी अरविन हिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पती सोहेल याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.