जबर मारहाण केल्यानंतर पत्नीला दिला ट्रिपल तलाक, मदतीसाठी कुटुंबीयांची PM मोदींना साद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने देशात तिहेरी तलाकविरुद्ध कायदा लागू केल्यानंतर सुद्धा तिहेरी तलाकच्या घटना समोर येत आहेत. आता दिल्लीतल्या कबीर नगरमध्ये एका महिलेस तिच्या पतीने तलाक दिला आहे. पीडितेच्या आईने सांगितल्यानुसार, निकाहानंतर महिलेचा पती हुड्यांसाठी त्याचसोबत मुलं होत नसल्याच्या कारणाने मारहाण करायचा. २७ मे २०१६ रोजी सरामजहा यांची मुलगी गुलनाजचा निकाह सलमानसोबत झाला होता.

याबाबत बोलताना पीडितेची आई म्हणाली, निकाहानंतर सलमान गुलनाजचा सतत मारहाण करत असे. चारित्र्याच्या संशयावरुन त्याने ३ दिवस बंद खोलीत गुलनाजला बेदम मारहाण करत, तिच्या आईसमोर तिहेरी तलाक दिला. मग सरमजहा यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. पंरतु, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं.

त्यानंतर पुन्हा १४ डिसेंबरला गुलनाजच्या कुटूंबियांनी गोकुलपुरी पोलीस ठाण्यात पोहचत तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री २ पर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. परत पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली, पण सलमान विरुद्ध फारशी गंभीर कलमे लावली नाही. यामुळे त्यास पोलीस ठाण्यातूनच जामीन भेटला. हा प्रकार लक्षात घेता गुलनाजच्या कुटूंबियांनी पोलीस उपायुक्तांपुढे आपली समस्या मांडली. मग कुठेतरी सलमान विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात काही गंभीर कलमांची भर टाकली.

समरजहा यांनी पुढे सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम महिलांकरिता चांगले निर्णय घेतले. पंरतु, तिहेरी तलाक कायदा आणूनही न्याय मिळत नसेल तर, पोलिसांनी पंतप्रधानांचं एकूण काही तरी ठोस कारवाई करायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.