लाच प्रकरण भोवलं ! त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्‍तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांना लाच प्रकरण भोवले आहे. लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एका इंग्रजी वर्तमान पत्रामध्ये त्यांसंदर्भात बातमी आल्यानंतर सर्वच स्तरातून धारूरकर यांच्यावर टीका होत होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याने डॉ. धारूरकर यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे.

लाच प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर धारूरकर यांनी हे आपल्याला बदनाम करण्यासाठी केले जात असून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले होते. दरम्यान, बदनामीकारक वातावरण निर्माण केले जात असल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विद्यापीठात महाराष्ट्र विरोधी वातावरण आहे. वर्षभरात मी विद्यापीठाचा महसूल 4 कोटीवरून 12 कोटींवर नेला होता. काही जणांना विद्यापीठाची प्रगती सहन होत नव्हती. त्यांनी मला विनाकारण टार्गेट करण्यास सुरवात केली होती. आता मी माझ्या पदाचा राजीनमा दिला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, धारूरकरांचा लाच प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, त्रिपुरा विद्यापीठ हे धारूरकरांच्या पाठिशी उभे राहिले आहे.

काही समाजकंटकांनी विद्यापीठ आणि धारूरकरांच्या बदनामीसाठी हे कारस्थान केल्याचे विद्यापीठानं पत्रक काढून सांगितलं आहे. धारूरकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्‍तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. धारूरकरांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याची उलट-सुलट चर्चा सुरू झाी होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like