शिक्षिकेला ‘अश्लील’ मेसेज पाठवणारा संस्थाचालक ‘गोत्यात’, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यातील गंगादेवी येथे एका शिक्षिकेला त्रास देणाऱ्या संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. अंकुश शिवाजी पालवे असे या आरोपी संस्थाचालकांचे नाव असून त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात या आरोपी शिक्षण संस्थाचालकांची एक खासगी शाळा असून पीडित शिक्षिका या ठिकाणी सहा महिन्यांपूर्वी कार्यरत होत्या. मात्र त्यानॆ आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या आरोपीने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. मोबाईलवरून अश्लील मॅसेज पाठवून तो त्यांना त्रास  देत असे. सुमारे सहा महिने हा प्रकार सुरु होता. अखेर अति झाल्याने त्यांनी या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.  दरम्यान, आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You might also like