#MeToo : खरं-खोटं सगळं बाहेर येईल – अमृता फडणवीस 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – #मी टू  आज शहरांपुरतेच मर्यादित आहे पण गावामध्ये याची जागरूकता होणे महत्वाचे आहे . असे मत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकंदर #मी टू ला पाठिंबा दिला . नाशिक येथील अहिल्या फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सहकार्याने राज्यात राबविलेल्या सॅनीटरी नॅपकीन वितरण कार्यक्रमाचा समारोप येथे झाला.यावेळी त्या बोलत होत्या. सध्या मी टू  बॉलिवूड मध्ये जास्त पसरले आहे . पण असे प्रसंग प्रत्येक पातळीवरची स्त्रीवर येतात. असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17b7b784-d207-11e8-8477-8f5336c9d2d8′]

यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या ,गावांमध्ये याची जागरुकता होणं गरजेचं आहे. खरी शोषित महिला पुढे येऊन स्वतःचा बचाव करतेय, तसेच दुस-याला त्यासाठी जागरूक करेल. यात खरं आणि खोटं सगळं बाहेर येईल, असे प्रसंग होतायत ही खरी गोष्ट आहे. परंतु या महिलांचं ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी एक वेगळी कमिटी तयार होणार आहे. अशा प्रकरणात पॉजसारखे कायदे महिलांना साह्य करतील.
[amazon_link asins=’B0119ROQXY,B06X6DK2HJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’23535d3c-d207-11e8-9442-9f632c33c859′]
 केंद्रीय मंत्री एम. जे अकबर यांच्यावर आरोप होऊनही त्यांनी अद्याप राजीनामा दिला नाही. ते केव्हा राजीनामा देणार? यावर बोलण्यास त्यांनी ‘नो पाॅलिटीक्स” असे सांगून बोलण्यास नकार दिला. शबरीमाला मंदिरात प्रवेशाचा सर्वांना समान हक्क आहे. सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे. तसेच महिला आणि मुलींनी रूढी परंपरांना थारा न देता, कोणताही न्यूनगंड न बाळगता सॅनिटरी नॅपकिन वापरावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.