लातूर : पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न 

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्त मुरुड गावाच्या गावकऱ्यांनी हलगीनाद आंदोलन केले. त्यावेळी त्या आंदोलकांनी सवर्साधारण सभेच्या दालनाजवळ जोरदार हलगी नाद केला. त्यांच्या आंदोलनाने गदारोळ माजल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुरुड गावाच्या ग्रामस्थांनी प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या दालनासमोर हलगी नाद आंदोलन केले. त्यावेळी जिल्हापरिषदेच्या सभागृहाजवळ मोठा गोंधळ माजला. सभागृहात कामकाजाला अडथळा निर्माण झालाने पोलीसांनी आंदोलकांना जबरदस्ती ताब्यात घेतले. त्याच प्रमाणे त्यांच्या जवळील हलग्या देखील पोलीसांनी ताब्यात घेतल्या. आंदोलकांना घेऊन पोलीस शिवाजी नगरच्या पोलीस ठाण्याच्या निघून गेले.

पोलीसांनी केलेल्या दडपशाहीमुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेण्या ऐवजी त्यांच्यावर दादागिरी दाखत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे गावकरांच्या मागण्याचे काय झाले. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार कि नाही या बाबत प्रशासनाने कसलीही माहिती दिली नाही. मात्र पोलीस बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रकार केला आहे.

2016 ते 2019 मधील कवकशी अहवालात अनेक गँभीर बाबी समोर आल्या आहेत मात्र तो अहवाल प्रशासनाने जाणीवपूर्वक दडपून ठेवला आहे तो सार्वजनिक करावा आणि आंदोलन का दडपल याचा खुलासा प्रशासनाने करावा अशी मागनि आंदोलकांनी केलीय.

 

Loading...
You might also like