तुकाराम मुंढे सांभाळणार ‘या’ विभागाची जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या वादाच्या भोवऱ्यात अनेकदा सापडलेले आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. अखेर तुकाराम मुंढे यांना आज (बुधवार) पोस्टिंग मिळाली आहे. राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांच्याकडे राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.

तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे अधिकारी आहेत. नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. त्यानंतर त्यांची काही महिन्यापूर्वी नागपूरच्या आयुक्तपदावरुन त्यांची बदली झाली होती. त्यांच्याकडे कोणत्याही विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. त्यामुळे ते पदभारविना होते. दरम्यान, आज राज्य सरकारने त्यांच्याकडे राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या अन्य नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची सहकार, मार्केटिग आणि वस्त्र उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उदय जाधव यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगामध्ये सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.