Tulshibaug Pune Crime | गर्दीत महिलेची पर्स लंपास; सव्वा लाखांचा ऐवज चोरीला; तुळशीबागेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Tulshibaug Pune Crime | पुण्यातील तुळशीबागेत गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एका महिलेची पर्स चोरून नेली. चोरट्यांनी पर्समधील एक लाख 21 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि.14) दुपारी तीनच्या सुमारास घडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Tulshibaug Pune Crime)

याप्रकरणी मुळशी तालुक्यातील पिरंगूट येथे राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला नातेवाईकांसोबत रविवारी तुळशीबागेत खरेदीसाठी आली होती. याठिकाणी फिरत असताना त्यांनी मक्याचे कणीस खरेदी केले. त्याचे पैसे दिल्यानंतर हँड पर्स कापडी पिशवीत ठेवली. या पर्समध्ये मिनी गंठण आणि सोन्याचे कानातले व रोख रक्कम होती.

फिर्यादी तेथून पायी चालत तुळशीबागेतील कावेरी आईसक्रीम सेंटर येथे आल्या.
आईस्क्रीम घेण्यासाठी पैसे देण्याकरता त्यांनी पिशवीमधून पर्स काढण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्यांना पिशवीत पर्स दिसली नाही.
पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cheating Fraud Case Pune | पुणे : आयटी अभियंता तरुणीला 14 लाखांचा गंडा, स्काईप आयडीवरून अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले

Shirur Lok Sabha | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

Amol Kolhe On Ajit Pawar | पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला

BJP MLA Mangesh Chavan | भाजपा आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, ”मंत्रालयातील तिजोरीचा चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा…”, फडणवीसांचाही उल्लेख

Pune News | केएसबी पंप ने कृषी आणि घरगुती पंपांची नवीन श्रेणी केली लॉन्च