गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक पलटी, चालकाचा मृत्यू

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन – येवल्याहून मनमाडकडे औद्योगिक वापरासाठी लागणारे गॅस सिंलेडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून त्याच्या शरिरावर जखमा नसल्याने ट्रक चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. हा अपघात पुणे-इंदूर महामार्गावर झाला. ट्रकमधील सिलेंडर रिकामे असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात ट्रक चालक गजेंद्र एस सिंग (रा: बेहला, कोलकाता (पश्चिम बंगाल) याचा मृत्यू झाला.

गजेंद्र सिंग हा औद्योगिक कारणासाठी वापरण्यात येणारे हायड्रोजन गॅस सिलेंडर घेऊन मनमाड कडून औरंगाबाद कडे जात होता. त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अनकवाडे जवळील गोरक्षनाथ डोंगर परिसरात रस्त्यावर पलटी झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही वेळ खोळांबली होती. घटनेची माहिती मिळताच येवला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देविदास पाटील हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मयत चालकाच्या शरीरावर खरचटल्याच्या देखील जखमा नसल्याने त्याचा अपघाताच्या आधी किंवा नंतर हृदयविकाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी शवविच्छेदन अहवाला नंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us