TV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive ! करत होती मालिकेचं शुटींग

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   लहान पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिला कोरोनाची लागण झाली आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, श्वेता कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिनं स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. हा कठिण काळ आहे. परंतु आपण सावधानी घेत वेळेत उपचार घ्यायला हवेत असं श्वेता म्हणाली आहे.

‘मी शुटींग सोडून लगेच कोरोना टेस्ट केली’

श्वेता तिवारी मेरे डॅड की दुल्हन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. रिपोर्टनुसार श्वेता म्हणाली, “मला स्वत:मध्ये कोरोनाची लक्षणं जाणवली. 16 सप्टेंबर रोजी माझी तब्येत बिघडली. यानंतर मी शुटींग सोडून लगेच कोरोना टेस्ट केली. मला कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करायचा नव्हता. मी लोकांच्या आसपास होते आणि बरेच लोक माझ्या आजूबाजूला होते” असंही ती म्हणाली आहे. सध्या ती होम क्वारंटाईन आहे.

श्वेतानं असंही सांगितलं की, तिचा कोस्टार वरुण बदोलानं त्याची पत्नी राजेश्वरी सचदेव हिला कोरोना झाल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी स्वत:ला क्वारंटाईन केलं होतं. श्वेता 1 ऑक्टोबरपर्यंत होम क्वारंटाईन राहू शकते अशी माहिती आहे.

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती हम तुम और देम या वेब सीरीजमध्ये दिसली होती. या सीरीजमध्ये तिनं लिपलॉक किसिंग सीनसोबत अनेक बोल्ड सीन दिले होते. याशिवाय सध्या ती मेरे डॅड की दुल्हन या मालिकेत काम करत आहे.