कॉमेडियन कपिल शर्माची पत्नी ‘गिनी चतरथ’च्या बेबी शावरमध्ये निप्पल बॉटलने पाणी पिऊ लागले सर्व स्टार्स ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिनी चतरथ लवकरच आई बाबा होणार आहेत. नुकतीच कपिलने गिनीच्या बेबी शावरची एक ग्रँड पार्टी दिली आहे. यावेळी कपिल शर्मा शोची पूर्ण टीम पोहोचली होती. या पार्टीत हे सर्व स्टार लहान बाळाच्या निप्पल बॉटलने पाणी पिताना दिसले. अर्चना पूरण सिंहने या गोष्टीची पोलखोल केली आहे. भारती आणि कृष्णा अभिषेकसह इतर सर्वांनी या बाटलीने पाणी पिले.

कपिल आणि गिनीच्या या पार्टीत कीकू शारदा, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, शुमोना, अर्चना पूरण सिंह यांसारखे अनके स्टार्स आले होते. या पार्टीत एक स्पर्धा ठेवण्यात आली होती. यात लहान बाळाच्या बाटलीने सर्वांना लिक्वीड प्यायचं होतं. यात ज्यूस होता जो संपवायचा होता. या सर्वांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. कीकू शारदा या स्पर्धेत विजयी ठरला.

अर्चना पूरण सिंहने हा बेबी शावरचा व्हिडीओ शेअर केला आहे. गिनीदेखील व्हिडीओत आपल्या बेबी बंपसोबत दिसत आहे. कपिल आणि गिन्नी गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाले होते.

View this post on Instagram

💕

A post shared by Ginni Chatrath (@ginnichatrath) on

 

Visit  :Policenama.com

 

You might also like