स्टेशन रस्त्यावरून वीस लाखांचे मद्य चोरीला

अहमदनगर: पोलिस ऑनलाईन – स्टेशन रस्त्यावरील राजासहाब वाईन्सचे गोडाऊन फोडून सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचा मद्यसाठा चोरून नेल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली.
स्टेशन रस्त्यावरील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर राजासहाब वाईन्स नावाचे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागील बाजूस मद्यसाठा ठेवण्यासाठी गोडावून आहे. रात्रीच्या सुमारास कोणीतरी गोडावूनचा पाठीमागील दरवाजा तोडून आतील तब्बल पंधरा ते वीस लाख रुपयांची वाईन, बिअर, दारु चोरून नेली. आज सकाळी घटनेचा उलगडा होताच अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोडाऊनची पाहणी केली. पंधरा ते वीस लाख रुपयांचे वाईन व विना कंपन्यांच्या दारूचे बॉक्स चोरीस गेल्याचे दुकान मालकाकडून सांगितले जात आहे. मात्र निश्चित आकडा स्पष्ट होऊ शकला नाही.

जिल्ह्याधिकारी कार्यालयात नोकरीच्या अमिषाने २ लाख ७० हजारांची फसवणूक 

शहरातील रहदारीच्या रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावरील दारू चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
दुकान बड्या राजकीय व्यक्तीचे

सदर दुकान हे शहरातील बड्या राजकीय व्यक्तीचे आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या चोरीबाबत शहरात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.