Twitter डाऊन ! अनेक यूजर्स करू शकत नाहीत काहीही पोस्ट, सोशल मीडिया साइटनं सांगितलं कारण
नवी दिल्ली : वृत्त संस्था – कंपनीच्या मायक्रोब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग साइटवर काही यूजर्स काहीही पोस्ट करू शकत नाहीत आणि त्यांना ते वापरण्यात अडचणी येत आहेत. हे इंटरनल सिस्टममधील एखाद्या समस्येमुळे होत आहे, असे ट्विटरने म्हटले आहे.
कंपनीने एक ट्विट करून माहिती दिली की, ते ही समस्या ठिक करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. ही समस्या कोणत्याही हॅकिंग किंवा सुरक्षेतील गडबडीमुळे झालेली नाही.
समारे दोन आठवड्यांपूर्वी सुद्धा ट्विटर अशाच प्रकारे डाऊन झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी जगभरातील अनेक देशात ट्विटर सेवा ठप्प झाली होती. ही समस्या वेबसाइट, अँड्रॉयड आणि आयओएस तिन्ही प्लॅटफॉर्मवर होती.
यापूर्वी जुलैमध्ये जगभरातील अनेक प्रमुख नेते, सेलिब्रिटी आणि तंत्रज्ञान जगतातील उद्योगपतींची ट्विटर अकाऊंट हॅक होण्याचा प्रकार घडला होता.
या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी उप राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशिवाय मार्क ब्लूमबर्ग आणि अमेझॉनचे सीईओ जेफ बीजोस, मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची ट्विटर अकाऊंटवरून बनावट ट्विट करण्यात आली होती.
सोबतच, केनये वेस्ट आणि त्याची पत्नी किम कर्दाशियन वेस्ट यासारख्या सेलिब्रिटींची अकाऊंट सुद्धा हॅक केली होती. या ट्विटद्वारे एका अज्ञात बिटक्वाइन पत्त्यावर प्रत्येकाला 1,000 डॉलर पाठवल्यास 2,000 डॉलर देण्याचे अमिष दाखवण्यात आले होते.