Amravati News : गुंगीचं औषध देऊन काढले आक्षेपार्ह फोटो, धमकी देत लैंगिक अत्याचार, दोघे गजाआड

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीला शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.सूरज रामटेके (वय ३४) आणि अन्य एक महिला यां अटक करण्यात आली असून न्यायालयानं दोघांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, २० मे २०२० ते ८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घरकाम करायचं असल्याचं कारण सांगून आरोपी महिलेनं पीडित मुलीला घरी बोलावलं होतं. त्यावेळी तिला शीतपेयातून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर संशयित आरोपी सूरज रामटेके आणि त्या महिलेनं पीडित मुलीची निर्वस्त्र छायाचित्रं काढली. त्यानंतर पीडितेला छायाचित्रं दाखवून धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडितेनं फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.