दहावीत शिकणाऱ्या २ मुलींची आत्महत्या, एकीवर उपचार सुरु

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील दहावीतील तीन मुलींनी उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दोन मुलींचा सकाळी मृत्यू झाला. यानंतर मृत मुलींच्या नातेवाईकांनी पाणीपुरी खाल्ल्याने मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. मात्र, यामध्ये वाचलेल्या मुलीने पाणीपुरी नाहीतर उंदीर मारण्याचे औषध पिल्याचे सांगितले.

नयना शिंदे (वय-१७), निकिता रोहनकार (वय-१५) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यानींची नावे आहेत. तर वाचलेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या तिघींनी शुक्रवारी शाळेतून घरी परत येत असताना उंदीर मारण्याचे औषध पिले होते. त्यानंतर त्यांनी पाणीपुरी खाल्ली होती.

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातल्या २ मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला. पाणीपुरी खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला असा आरोप या दोघींच्या नातेवाईकांनी केला. पण आता या तिन्ही मुलींनी उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे. अभ्यासाच्या तणावातून या तिघीही हे कृत्य केलं. यातल्या नयना शिंदे आणि निकिता रोहनकार या दोघींचा सकाळीच मृत्यू झाला तर तिसरीवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी प्रॅक्टिकल संपून घरी परत येताना ३ शाळकरी मुलींनी रस्त्यात पाणीपुरी खालली होती, त्यामुळेच विषबाधा झाली, असं या मुलींच्या पालकांना वाटलं होत. पण यामध्ये वाचलेल्या मुलीने खरे कारण सांगितले.