दोन विमानांची आकाशात टक्कर 

वॉशिंग्टन : वृत्तसंथा

फ्लोरिडा येथे दोन शिकाऊ विमानांची आकाशातच टक्कर झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १९ वर्षाच्या भारतीय तरुणीचा समावेश आहे. निशा सेजवाल असे भारतीय युवतीचे नाव आहे.  ही दुर्घटना मंगळवार १७ जुलै रोजी  घडल्याचे उड्डयन प्राधिकरणाने म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’42a23e24-8b0b-11e8-a930-2390d9e115e2′]

फ्लोरिडातील या दोन्ही विमानांचे उड्डाण शिकाऊ पायलटांकडून करण्यात आले होते. या अपघातात या दोन पायलटांसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आणखी एकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात १९ वर्षाच्या भारतीय मुलीचा मृत्यू झाला असून तिने २०१७ मध्ये येथील शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतला होता. हे दोन्ही विमान पायपर पीए-३४ आणि सेसना १७२ डीन इंटरनॅशनल फ्लाइट स्कूलमधील असल्याची माहिती मियामी डेड काऊंटीच्या महापौरांनी दिली. गेल्या १० वर्षात या विमान प्रशिक्षण स्कूलमधील १२ पेक्षा जास्त विमानांचा दुदैर्वी अपघात झाला आहे.