आरोग्यदायी ‘गांजा’ भारतात वैध करा : उदय चोप्राची अजब मागणी

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

भारतात गांजा वैध करण्यात यावा. गांजा वैध केल्यास तो एक महसूलाचा मोठा स्त्रोत ठरेल. तसेच त्याचे मोठ्या प्रमाणात वैद्यकीय फायदे आहेत. असे मत अभिनेता उदय चोप्रा याने ट्विटरवर व्यक्त केले आहे.
[amazon_link asins=’B00TFGWAA8,B00UWM5JJI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’60ceb1b0-b816-11e8-aa6e-d3e7599922b9′]

अभिनेता उदय चोप्राने आपल्या ट्विटरवर लिहिलंय, ”मला वाटतं भारतात गांजा वैध केला पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. दुसरे असे की, याला जर वैध ठरवण्यात आले आणि त्यावर कर बसवला तर हा महसूल मिळवण्याचा मोठा स्रोत होऊ शकतो. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, याचे खूप काही वैद्यकिय लाभ आहेत.”
[amazon_link asins=’B07DFYSGS3,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’667fc1cc-b816-11e8-9a24-e71905dfe3a6′]
हिंदी चित्रपट सृष्टितील दिग्गज चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा अभिनेता उदय स्वतः गांजाचे सेवन करीत नाही. परंतु याला वैध ठरवणे बुध्दीमत्तेचे पाऊल ठरेल असे त्याला वाटते.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.