Udayanraje Bhosale | उदयनराजेंचा राज्यपाल अन् सुधांशू त्रिवेदींना कडक इशारा, म्हणाले – ‘राज्यपालांची रवानगी आता वृद्धाश्रमात करा’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी मागील दोन दिवसांत मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर केलेल्या भाष्यामुळे राज्यात वाद सुरु आहेत. अनेक पक्ष आणि नेते राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावर आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यपालांची रवानगी आता वृद्धाश्रमात करा, असे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले आहेत.

 

भगतसिंह कोश्यारी यांना आता विस्मरण होत असून, त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली पाहिजे. कोश्यारींवर कारवाई केली नाही, तर मी माझ्या पद्धतीने योग्य वेळ आल्यावर माझी भूमिका जाहीर करेन. राज्यातील प्रत्येक पक्ष शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय राजकीय किंवा सामाजिक कार्याला सुरुवात करत नाहीत. देशाला एकत्रित ठेवायचे असेल, तर शिवाजी महाराजांचे विचार जपावे लागतील. अन्यथा, भविष्यात देशाचे तुकडे होतील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना पक्षातून हटवावे. तसेच सरकारला जमत नसेल, तर त्यांची जीभ कशी हासडायची ते मी माझ्या पद्धतीने बघतो, असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) सुधांशू त्रिवेदी आणि राज्यपालांना इशारा दिला आहे.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुन्या काळातील नायक आहेत,
आता तुम्हाला या काळात नवीन नायक मिळतील.
त्यात डॉ. आंबेडकरांपासून शरद पवार (Sharad Pawar), नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आहेत म्हंटले होते.
त्यावरुन राज्यात त्यांच्यावर टीकांचा पाऊस पडला.
अनेक पक्ष आणि संघटनांनी त्यांची जागा खाली करण्याची मागणी केली.
त्यावर उदयनराजे भोसले यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
त्यांच्या पक्षाशी संबंधित लोक शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक बोलत असल्याने त्यांनी दोघांना इशारा दिला आहे.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | bjp mp chhatrapati udayanaraje has expressed his anger on the governor bhagat sing koshyari statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Supriya Sule | ‘पत्रकार मुली साड्या का नाही नेसत?’ विधानावर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

Sanjay Raut | राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; शिवसेना खासदार म्हणाले – ‘हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय…’

Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2 | ‘दृश्यम 2’मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य; पोस्ट व्हायरल