Udayanraje Bhosale | मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्याचा मोठ्या नेत्याने केले समर्थन; शरद पवारांवर हल्ला…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण प्रचंड तापले आहे. पहिल्यांदा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेत त्या दोन्ही वक्तव्यांचा निषेध केला होता. त्यावेळी त्यांनी राज्यपालांबद्दल बोलताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. यासंबंधी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेण्याची तयारी त्यांनी (UdayanRaje Bhosale) दाखवली होती.

 

पण, त्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वादळ उठले. यासंबंधी उदयनराजे (Udayanraje Bhosale) अजून काही बोलले नसले तरी मराठा समाजाच्या एका मोठ्या नेत्याने मंगलप्रभात लोढा यांना त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांना ‘जाणता राजा’ म्हटले जाते. मग एखाद्या राज्यकर्त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी केली, तर त्यामध्ये काही गैर नाही.” (Udayanraje Bhosale)

 

“शरद पवार यांनादेखील जाणता राजा म्हणून संबोधले जाते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी कामं केली.
छत्रपती शिवरायांचे अष्टपैलू नेतृत्व आहे. त्यांची शेतकऱ्यांबद्दलची भूमिका, गडकिल्ल्यांबद्दल भूमिका,
हिंदुत्व वाचवण्याची भूमिका, यावर त्यांनी केलेल्या कार्यामध्ये आणि एखाद्या प्रतिनिधींनी किंवा नेत्यांचे कार्य चांगलं असेल
तर त्याची तुलना करणे गैर नाही,” असे नरेंद्र पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच भाजपमधील एका महत्त्वाच्या नेत्याने या प्रकारचे विधान केल्यामुळे सदर विधान छत्रपती उदयनराजे भोसलेंना चपराक असल्याचे मानले जात आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील माणूस म्हणून नरेंद्र पाटलांकडे पाहिले जाते.
उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या राज्यपालांच्या विरोधी आक्रमक भूमिकेमुळे भाजपने नरेंद्र पाटील
यांना पुढे करून उदयनराजेंच्या अडचणीत वाढ करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची चर्चा आहे.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | devendra fadnavis close aide narendra patil counter statement on udayanraje bhosale stand over shivaji maharaj insult

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR

Pune Rickshaw Strike | रिक्षाचालकांच्या अडचणीत वाढ? रॅपिडोला अ‍ॅग्रिगेटर परवाना देण्यावर पुनर्विचार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे आरटीओला आदेश