Uddhav Thackeray | ‘भाजपशी पॅचअप करु शकलो असतो, पण…’ उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर इतर पक्षांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाने तयारीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. पदाधिकाऱ्यांकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. याच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मातोश्रीवर आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीमध्ये विदर्भातील लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जात आहे. शिंदे गटाच्या (Shinde Group) खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचा (Yavatmal-Washim Constituency) आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय इतर मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत अकोला लोकसभा मतदारसंघ वंचित बुहजन आघाडीसाठी (Vanchit Bahujan Aaghadi) सोडण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे गटात इनकमिंग सुरु असून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Former MP Bhausaheb Wakchaure) यांनी ठाकरे गटात (Thackeray Group) प्रवेश केला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

भाजपशी पॅचअप करु शकलो असतो, पण…

शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. मी भाजपशी (BJP) पॅचअप करु शकलो असतो. पण माझ्या नितिमत्तेत ते बसत नव्हते. 2014 पासून ज्यांनी फसवले त्यांच्यासोबत कसे जाणार? मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुलटे आहेत त्यांना डांबून काय करणार? त्यांना मी काय कमी केले होते? स्वाभिमान महत्वाचा होता. शिवसेनेचा दरारा कायम राखणे महत्त्वाचे होते. त्यामुळे मी कोणतीही तडजोड केली नाही. मी भाजपसोबत गेलो नाही, असे उद्धव ठकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे

जुने निष्ठावंत सोडून जातात त्याचे वाईट वाटते. तुमच्या पैकी कुणाला जायचे असेल तर खुशाल जाऊ शकता.
संकटे येतात आणि संकटे जातात. मी खंबीर आहे. आपण तुन्हा सत्तेत येणार आहोत, असे सांगतानाच माझा काही
स्वार्थ नाही. मला निवडणूक लढवायची नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | गोल्डन अवरमध्ये केली तक्रार सायबर फसवणुकीतील सर्व पैसे सुरक्षित

Credit Card Update | आत्ता तुम्ही देखील वाचवू शकता क्रेडिट कार्डवरील इंटरेस्ट; रक्कम हस्तांतरित करण्याची नवीन सुविधा उपलब्ध