Uddhav Thackeray Birthday | सत्ताधार्‍यांना जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं ! उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस (Uddhav Thackeray Birthday) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यानिमित्त ठाकरे यांची भेट घेत आहेत. तसेच सर्वपक्षीय नेते सुद्धा ठाकरे यांचे अभिष्टचिंतन (Uddhav Thackeray Birthday) करत आहेत. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी एकच मजकूर तयार करून वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांच्या या शुभेच्छांमध्येही राजकीय डावपेच दिसून आल्याने यावरून चर्चा सुरू झाली आहे. शिंदे-फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता केवळ माजी मुख्यमंत्री (Former CM) असा केला आहे.

 

वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्ये (Uddhav Thackeray Birthday) सुद्धा शिंदे-फडणवीसांनी केलेल्या या राजकारणाला उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आपल्या शुभेच्छांमधून उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख असल्याचे अधोरेखित केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! ठाकरे यांना दीर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना, अशा शब्दांत शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख जाणीवपूर्वक ’शिवसेना पक्षप्रमुख’ असा केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा ! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो !
दरम्यान, राजकीय वर्तुळासह समाजातील सर्वच स्तरांतून उद्धव ठाकरे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

 

Web Title : –  Uddhav Thackeray Birthday | ncp chief sharad pawar give birthday best wishes to shiv sena chief uddhav thackeray cm eknath shinde and devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा