Uddhav Thackeray | भाजपचा बालेकिल्ला भुईसपाट केला, उद्धव ठाकरेंकडून रवींद्र धंगेकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी सपत्निक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधक ताकदीनिशी एकत्र आले मात्र आपण भाजपला (BJP) आस्मान दाखवू शकतो याचा आत्मविश्वास रवींद्र धंगेकर यांनी दिला. साधारण 30 वर्षापासून भाजपचा असलेला बालेकिल्ला भुईसपाट करुन आपण जिंकू शकतो हा आत्मविश्वास केवळ पुणेकरांनाच नाही तर महाराष्ट्राला आणि देशातील जनतेला दिला. त्यामुळे पुढील निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने काम करुन जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला.

कसब्यात शिवसैनिकांनी जीवाचं रान करुन मला मदत केली. निवडणुकीत माझ्यामागे खंबीर उभे राहिले, याबद्दल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे धन्यवाद मानल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. यावेळी खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) , आमदार सचिन अहिर (MLA Sachin Ahir), काँग्रेस नेते मोहन जोशी (Congress leader Mohan Joshi) उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स.का.पाटील (S.K.Patil) विरुद्ध जॉर्ज फर्नांडिस
(George Fernandes) यांच्या लढतीची आठवण करुन दिली.
ते म्हणाले जॉर्ज फर्नांडिस नावाच्या नवख्या उमेदवाराने काँग्रसचे मातब्बर उमेदवार स.का.पाटील यांना
पराभवाची धूळ चारली होती. जॉर्ज फर्नांडिस यांनी घोषणा दिली होती की आपण-तुम्ही-आम्ही स.का. पाटलांना पाडू शकतो. सर्वांना असं वाटलं होतं की सका पाटलांसारखा उमेदवार असताना जॉर्ज फर्नांडिस याचं काय करु शकणार? पण चमत्कार झाला आणि जर्ज निवडून आले. त्याच विजयाची आठवण आज कसब्याने करुन दिल्याचे ठाकरे म्हणाले.

तुम्ही पंतप्रधान होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. माझ्या मनात असं कोणतंच स्वप्न नाही.
स्वप्नात मी रमणारा-दंगणारा नाही. जी जबाबदारी येते ती मी पार पाडतो.
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर आली होती, ती ही खमकेपणाने मी पार पाडली.
पण एक नक्की देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम देशातल्या जनतेने खांद्यावर घेतली पाहिजे,
असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title :   Uddhav Thackeray | congress mla ravindra dhangekar met shiv sena uddhav thackeray at matoshree after wining kasba bypoll election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणेकरांना 40 टक्के मिळकत कर सवलत पुन्हा लागू करा; विधी मंडळाच्या पायऱ्यांवर आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांचे आंदोलन

MLA Bachchu Kadu | आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा, काय आहे प्रकरण?

Pune PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांची भरती, सरळसेवा पद्धतीने होणार भरती; जाणून घ्या सविस्तर