Uddhav Thackeray | दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरेंची याचिका फेटाळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी फूट पाडली. त्यानंतर त्यांनी मूळ पक्षावरच दावा केल्याने वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) दरबारात गेला. अखेर आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह गोठविण्याचा हंगामी निर्णय घेतला. त्यामुळे दोनही गटांना वेगवेगळी नावे आणि पक्षचिन्हे देण्यात आली होती. या विरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे.

 

शिवसेनेचे धनुष्याबाण पक्षाचे नाव गोठविण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे न्यायालयात गेले होते. पण न्यायलयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. यावर सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायलयात ठाकरेंकडून युक्तीवाद करण्यात आला. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील आपले मत मांडण्याची मुभा देण्यात आली.

न्यायमूर्ती नरुला (Justice Narula) यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने आयोगाला या वादावर लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाचा नाव आणि चिन्ह गोठविण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा ठाकरेंच्या वकिलांनी केला होता. त्यावर न्यायालयाने हा अंतिम निकाल नसून अद्यापही अंतिम निकाल येणे बाकी आहे, असे म्हंटले आहे. तसेच या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.

 

 

मी पक्षाचा अध्यक्ष आहे. गेली ३० वर्षे मी शिवसेना पक्ष चालवीत आहे.
निवडणूक आयोगाने प्रथमदर्शनी जे दिसत आहे, त्याच्या आधारे निकाल दिला आहे.
त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठविता येणार नाही. मी माझ्या वडिलांनी दिलेले नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही,
अशा शब्दांमध्ये ठाकरेंची बाजू वकिलांनी मांडली.
तसेच आयोगाने दिलेले निर्देश हे बेकायदेशीर असल्याचा दावा देखील ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला होता.

 

Web Title :- Uddhav Thackeray | delhi high court dismisses uddhav thackeray plea against election commission decision to freeze shivsena bow and arrow party symbol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Naresh Mhaske | श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी शिंदे गटाकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

Jitendra Awhad | जामीन मिळताच आव्हाडांची प्रतिक्रिया; “…मला संपवण्यासाठी ठरवून”