Uddhav Thackeray | ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याचे नाव समजलेय, त्याला काय निरोप द्यायचा तो…’ – उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची आपबीती सांगितली (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक शनिवारी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात पार पडली. यावेळी उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना संबोधीत करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहण्यावरुन सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला होता. त्याचाही खरपूस समाचार ठाकरे यांनी यावेळी घेतला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, तुमचा दलाल महाराष्ट्रात बसला होता. राज्यपाल (Governor of Maharashtra) मला पत्र लिहून तुम्हाला साक्षात्कार होतो का असे विचारत होते. मंदिरे उघडा म्हणून सांगत होते. मी मंदिरे उघडली नाहीत. सर्व धर्मियांची उघडली नाहीत, या सर्वांनी माझे ऐकले. प्रवासी मजूरसुद्धा तिकडे गेल्यावर महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) आमची कशी काळजी घेतली हे सांगतात. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) फोटोवर हातोडा चालवताय, शिंदे गटाची शेपूट एवढी आत गेलीय. भाजपच्या (BJP) कार्यालयांवर, नेत्यांच्या बॅनरवर असे हातोडे मारण्याची हिंमत ठेवाल का? असा सवाल ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला.

त्या पोलिसाचे नाव समजलेय

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही भीक मागू, पण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोडणार नाही, असे मला नगरसेवकाने सांगितले. अनेकांना फोन येतायत. पोलीस फोन करतायत. मला त्या पोलीस अधिकाऱ्याचे (Police Officer) नाव समजलेय त्याला काय निरोप द्यायचा तो दिला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्याकडे खोके आहेत, आमच्याकडे जनता आहे. उपरा, दलाल येतोय आणि आमच्या मराठी माणसांवर दादागिरी करतोय. माझ्यासाठी मुंबई आई आहे तर तुमच्यासाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी असेल, असा टोला त्यांनी लगावला.

चौकशी करणार असाल तर…

माझ्या घरात एकही पैसा आलेला नाही. जर चौकशी करणार असाल तर ठाणे महापालिकेची (Thane Municipal Corporation) करा, पुणे (PMC), पिंपरी-चिंचवड (PCMC), नागपूर, उत्तर प्रदेश इथली देखील करा. त्यांचे शंभर अपराध भरत आलेत. तेव्हा जसासतसे कडक उत्तर द्यायची तयारी ठेवा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ही आमची परंपरा नाही

कालच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मी एकटाच असा होतो ज्याच्याकडे पक्ष नव्हता, पद नव्हते, मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, अध्यक्षपद असे काहीच नव्हते. आपण पुरुन उरणार हे त्यांना माहिती आहे,
पण यांना माहिती नाही, असे ठाकरे म्हणाले. मिळेल तिथे खा ही आमची परंपरा नाही.
कोरोना काळात मोदींनी नुसत्या थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या.
ऑक्सिजन देताना काय काय घडले हे सर्वांना माहिती आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला.

Web Title :  Uddhav Thackeray | i knew the name of that police officer uddhav thackeray told the corporators situation eknath shinde devendra fadanvis shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा