Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना जोरदार टोला, म्हणाले – ”हे म्हणजे बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपाचा…”

मुंबई : Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | ससून ड्रग्ज प्रकरणात (Sasoon Hospital Draugs Case) दोन मंत्र्यांची नावे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याने महायुती सरकार अडचणीत आले आहे. त्यातच यातील मुख्य आरोपी ललित पाटीलने (Drug Mafia Lalit Patil) ससूनमधून कोणी पळून जाण्यास भाग पाडले त्या सर्वांची नावे सांगणार, असे म्हटले आहे. रोज या प्रकरणात नवीन खळबळजनक खुलासे होत आहेत. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी मागील सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) यांच्यावरच टीकास्त्र सोडून प्रकरणाला राजकीय वळण दिल्याने आता ठाकरे-फडणवीस असा सामना रंगला आहे.

ललित पाटीलला २०२० मध्ये अटक झाली तेव्हा तो शिवसेनेचा (Shivsena) नाशिक शहराध्यक्ष होता. ललित पाटील शिवसेनेचा पदाधिकारी होता म्हणूनच त्याला तेव्हा सवलत मिळाली का? असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यांच्या या आरोपाला आता उद्धव ठाकरे यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ललित पाटील प्रकरणाचे सत्य सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांना अरविंद सावंत, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे फडणवीसांकडे प्रश्नांची उत्तरे नाहीत. (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis)

उद्धव ठाकरे म्हणाले, फडणवीसांच्या म्हणण्यानुसार, अटक केली तेव्हा ललित पाटील शिवसेनेचा नाशिक शहराध्यक्ष होता. मात्र, असे म्हणणे बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपा अध्यक्ष होता, असे म्हणण्यासारखे आहे.

काय म्हणाले होते गृहमंत्री फडणवीस
फडणवीस यांनी म्हटले होते की, १०/११ डिसेंबर २०२० मध्ये ललित पाटीलला अटक झाली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ललित पाटीलला नाशिक शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. गुन्हा मोठा होता आणि ललित पाटीलला अटक झाल्यानंतर १४ दिवसांचा पीसीआर (रिमांड) मिळाला. पीसीआर मिळाल्याबरोबर तो ससूनला दाखल झाला. तसेच पूर्ण १४ दिवस पीसीआरमध्ये ससूनमध्ये दाखल होता. यावेळी सरकारी पक्षाकडून न्यायालयात आम्ही आरोपीची चौकशी केली नसल्याचे अथवा त्याचा आजार योग्य नसल्याचे सांगत अर्जही केला नाही.

शेवटी १४ व्या दिवशी ललित पाटीलचा एमसीआर करून टाकण्यात आला. या गुन्ह्यात आम्ही खोलात जात
असताना गुन्हेगाराची चौकशीच झालेली नाही असे उघड होतेय. उद्या याच्याविरोधात खटला तयार करायचा आहे,
तर काय खटला उभा राहणार आहे. चौकशीच केली नाही.

आता माझा प्रश्न आहे की, ललित पाटीलची चौकशी का करण्यात आली नाही? याला कोण जबाबदार होते? तेव्हाचे
मुख्यमंत्री जबाबदार होते की, गृहमंत्री जबाबदार होते? त्यावर कुणाचा दबाव होता, कुणाच्या दबावात हे झाले,
यात कुणाचे संबंध होते. यात खूप गोष्टी आहेत, मात्र त्या मी आज सांगणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil on Narayan Rane | नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनोज जरांगेचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आपले आजोबा-पणजोबा…’

Pune Police MPDA Action | पुणे पोलिसांच्या इतिहासात प्रथमच अवघ्या 10 महिन्यात 50 जणांवर MPDA

Lok Sabha Elections | लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची पेरणी सुरु, दिवाळी आणि होळीला मिळणार मोफत गॅस सिलेंडर