Uddhav Thackeray On Election Commission | धोंड्या!… निवडणूक आयोगाचे उद्धव ठाकरेंनी केले नामकरण, म्हणाले ”माझ्या आजोबांनी पक्षाला दिलेलं नाव…”

बुलढाणा : Uddhav Thackeray On Election Commission | ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काही संबंध नव्हता, त्यांच्या पदरात पुन्हा भारतमाता टाकणार का? ते करायचं नसेल तर इथून फक्त आपल्या शिवसेनेलाच मतदान करा. त्यांची शिवेसना मी मानत नाही. माझ्या आजोबांनी पक्षाला दिलेलं नाव कोणीतरी त्यांना देत असेल आणि ही लोकशाही असेल तर याच लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो, धोंड्या आजपासून तो. शिवसेना फक्त आमचीच, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.(Uddhav Thackeray On Election Commission)

शिवसेना ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर दौऱ्यांना सुरुवात केली असून उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यात सभा घेतली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार प्रहार केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राची जिद्द गेली कुठे? सिंदखेड राजा हे जिजाऊंचं जन्मस्थान. याच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येकडे वळत असेल आणि गद्दार टिमकी वाजवत असेल तर बुलढाणाकरांची तरी जिजाऊंचं नाव घेण्याची योग्यता नाही. जिजाऊलाही समाधान वाटलं पाहिजे की मी ज्या तेजाला जन्म दिला त्याचा प्रकाश संपूर्ण देशावर पडला. पण त्या जिथे जन्मल्या तिथेच प्रकाश पडणार नसेल तर उपयोग काय? कशाला म्हणायचं जय जिजाऊ.

अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपावाले म्हणतात ते घराणेशाहीच्या विरुद्ध आहेत.
पण आम्ही तुमच्या एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीच्याविरोधात आहोत.
मुख्यमंत्री पद म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्षपद नाही की तुम्ही जसे तिथे जय शाहाला बसवले.

ते पुढे म्हणाले, माझे घराणे अगदी प्रबोधनकारांपासून महाराष्ट्रासमोर आहे. अमित शाह, तुमचे असे क्रिकेटमधले काय योगदान आहे? जय शाह विराट कोहलीचा प्रशिक्षक होता का? मुंबईमधील मॅच अहमदाबादला नेणे एवढेच त्याचे कर्तृत्त्व आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ही लढाई माझ्या एकट्याची नाही. तुमच्या पुढच्या पिढ्या लोकशाहीत जगाव्यात असे वाटते की हुकुमशाहीत जगाव्यात असे वाटते, हा विचार करून मतदान करा. सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही आणि एकाधिकारशाही उलथवून लावण्यासाठी एकत्र या, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MP Raksha Khadse | नाथाभाऊंच्या भाजपा घरवापसीबाबत रक्षा खडसेंचे सूचक वक्तव्य, ”बरेच लोकांचीही इच्छा…”

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक

Lok Sabha Election 2024 | पिंपरी : जास्त बुथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | ”…तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?