Uddhav Thackeray-PM Narendra Modi | …तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोकही जमले नसते, उद्धव ठाकरेंची भाजपावर कडाडून टीका

ADV

पनवेल : Uddhav Thackeray-PM Narendra Modi | भाजपाला संकटात ज्या पक्षाने साथ दिली, त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला (Shivsena) तुम्ही संपवायला निघालात. इतके नतद्रष्ट राजकारणी या देशात जन्माला आले असतील असे वाटत नाही. जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने खांद्यावर बसवून तु्म्हाला महाराष्ट्र फिरवला नसता तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोकही जमले नसते, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा केला आहे. (Uddhav Thackeray-PM Narendra Modi )

उद्धव ठाकरे म्हणाले, रायगड-मावळ मतदारसंघ म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि दुसरीकडे त्यांची राजधानी. येथे आपला पवित्र भगवा फडकणार नाही तर मग दुसरे कुठले फडके फडकणार? ही देशात पहिली निवडणूक होते असा भाग नाही. पण भाजपाचे सरकार चुकून आले तर ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल.

ADV

ते पुढे म्हणाले, हे म्हणतात पुन्हा येईन. पण पुन्हा येईन स्वतःच्या घरात जातात. ते परत लोकसभा किंवा विधानसभेत येऊ शकत नाहीत. एवढाच जर पुन्हा येईनचा आत्मविश्वास आहे तर फोडाफोडी कशाला करता?

उद्धव ठाकरे म्हणाले, येथील खासदाराने गद्दारी केली. त्याला तर आडवा करायचाच, पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत, ते ज्यांचे सरकार येते त्यांच्याकडे जातात. कुठेही गेले की आपले दुकान चालू. म्हणजे राजकारणातील दुकानदारी करणारे आहेत, त्यांची दुकाने बंद करायची आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी भाजपाबाबत म्हटले आहे की अब की बार भाजपा तडीपार, ते करायचे आहे. कारण इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता. दहा वर्षांत केले काय? तर काँग्रेसच्या काळातील योजनांची नावे बदलली, स्थानकांची नावे बदलली. हे नावेही त्यांच्या नेत्यांची देतात. नावे देता देता जुमल्याचेही नाव बदलले आणि मोदी गॅरंटी ठेवले.

मुख्यमंत्री एकनाथ शदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणोल,
कट्टर शिवसैनिक हे शिवसेनेबरोबरच आहेत. त्यांना शिवसेनेने फक्त प्रेम दिले.
याला म्हणतात निष्ठा. त्या गद्दारांचा जो नायक आहे त्यालाही विचारा, तू दाढी खाजवत जरा आठव.
कारण आपण काही आठवायचे असेल तर डोके खाजवतो हा दाढी खाजवतो.

पैसे खूप आहेत दाढी खाजवायलाही माणसे ठेवली असतील तर माहीत नाही.
शिवसेनेने देता येईल ते सगळे तुम्हाला दिले तरीही पाठीत वार केला. शिवसेनेच्या ओळखीवर निवडून आलात.
यांना वाटले की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच. आता घोडा कसा लाथ घालतो ते कळेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकीसाठी जप्तीसारख्या कारवाया करू
नयेत; पालकमंत्री अजित पवार यांचे महापालिकेला आदेश

Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रूपयांची देणगी सुपूर्त (Videos)

Editors Guild Of Pune-Pimpri | पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना, कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून सोशल मिडियाचा योग्य वापर, हरवलेली मुलगी तासाभरात आईच्या कुशीत सुखरूप

Uddhav Thackeray On BJP | भाजपाच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचारी नेत्याचं नाव, पण निष्ठावंत गडकरींना
टाळलं, उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र