Nanded Crime News | आर्थिक विवंचनेतून हतबल झालेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड (Nanded Crime News) जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पांगरी तांडा या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये लग्नाला आलेल्या मुलींच्या लग्नाची चिंता तसेच डोक्यावर कर्जाचा (Loan) डोंगर असलेल्या एका पित्याने स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पांगरी तांडा (Pangri Tanda) या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. नंदू बाबुराव जाधव (Nandu Baburao Jadhav) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. नंदू जाधव हा खासगी शैक्षणिक बस चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याला दोन मुली असून त्या लग्नाला आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात नंदू बाबुराव जाधव याने अनेक लोकांकडून कर्ज घेतले होते. त्याच्या डोक्यावरचे कर्ज हे वाढतंच चालले होते. आपल्या मुली लग्नाला आल्यामुळे त्यांच्या लग्नाचा प्रश्न त्याच्यासमोर होता. यामुळे तो आर्थिक विवंचनेत सापडला होता. याच विवंचनेतून नंदू जाधव याने शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास राहत्या घरी स्वतःवर डिझेल टाकून पेटवून घेतले.

 

या घटनेत तो मोठ्या प्रमाणात भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलिसांनी (Islapur Police) घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे (Islapur Thane Assistant Police Inspector Ravi Wahule)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश बोदगिरे (Sub-Inspector of Police Yogesh Bodgire) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Web Title :  Nanded Crime News | nanded man sets himself ablaze dies of burns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा