Uddhav Thackeray | ‘हा अत्यंत नीच प्रकार’; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जून महिन्यात मुंबई पोलिसांनी २२० बलेरो, ३५ एर्टीगा, ३१३ पल्सर बाईक्स आणि २०० ऍक्टिवा गाड्या विकत घेतल्या होत्या. २०१३ मध्ये केंद्रात सत्तेत असलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सुरु केलेल्या निर्भया फंडाअंतर्गत मिळालेल्या ३० कोटी रुपयांमधून या गाड्या खरेदी करण्यात आल्या. या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलिस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांनी टीका सुरु केली आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारची टीका केली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुद्धा या संबंधी त्यांचे मत मांडले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या गाड्या आमदारांसाठी वापरणे हा एक नीच प्रकार आहे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

 

मुंबईतील मातोश्री बंगल्यावर झालेल्या एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते. “निर्भया पथकासाठी वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणं, हा अत्यंत नीच प्रकार आहे. निर्भया पथक कशासाठी नेमली गेली हे सर्वांना माहिती आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तत्काळ मदत मिळावी, सहकार्य व्हावे, त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखले जावे, त्यासाठी ही पथके तयार करण्यात आली होती. आज त्या पथकातल्या गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत असेल, तर त्यांची वृत्ती काय आहे, हे आता लोकांना कळले पाहिजे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुढे त्यांनी कर्नाटक सीमावादावरही सरकारवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “एका बाजुला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटला आहे.
महाराष्ट्राच्या बाजुने कोणीच बोलत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखं बोलत आहेत.
काल त्यांनी कहर केला. आपले मुख्यमंत्री मात्र त्यांना स्क्रीप्ट लिहून दिलेल्या एवढंच बोलत आहेत.
हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, असं ते म्हणत आहेत. पण महाराष्ट्र जसा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे,
तसंच कर्नाटकनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघायला काय हरकत आहे.”

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray criticized shinde fadnavis government on nirbhaya vehicle issue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parineeti Chopra | अभिनेत्री परिणीती चोप्राने सांगितले तिच्या अपयशामागील कारण; म्हणाली “स्वप्नातही वाटले नव्हते… “

CM Eknath Shinde | ‘हा प्रकल्प होऊ नये म्हणून बैठका झाल्या’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

NPS Calculator | NPS मध्ये 15 हजार रुपये गुंतवा, 2.23 लाख रुपये दर महिना मिळेल पेन्शन, जाणून घ्या कॅलक्युलेशन