×
Homeताज्या बातम्याUddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ;...

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ; शिवसेनेतील बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांचा ठाणे दौरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. २६ जानेवारीला म्हणजेच उद्या उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तलाव पाळी परिसरात वैद्यकीय शिबीराला भेट देणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आनंद आश्रमात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

 

उद्या दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे हे महाशिबीरात येतील. पारी १२.५० मिनिटांनी ते टेंभी नाक्यावरच्या आनंदमठाला भेट देणार आहेत. दुपारी १.१५ वाजता उद्धव ठाकरे चरई जैन मंदिरात जाणार आहेत. दुपारी १.४५ ते २.३० पर्यंतची वेळ राखून ठेवण्यात आली आहे. यानंतर दुपारी ३ वाजता उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होतील. असा उद्धव ठाकरे यांचा उद्याचा नियोजीत ठाणे दौरा राहणार आहे.

याअगोदर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या नवरात्रोत्सवादरम्यान ठाणे येथे आल्या होत्या. त्यावेळी टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन त्यांनी घेतले होते. त्यावेळी देखील ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाचे केंद्रबिंदू हे ठाणेचं राहिले.
ठाण्यातील जवळपास सगळेच पदाधिकारी आणि नेते शिंदे यांच्यासोबत गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यालय देखील ठाण्यातच आहे.
शिवसेना पक्षाच्या वाढीमध्ये ठाणे जिल्ह्याचे योगदान फार मोठे मानले जाते.
शिवसेनेचे आणि ठाण्याचे एक वेगळेच नाते आहे.
मुंबईच्या अगोदर ठाण्यातच शिवसेनेचा पहिला महापौर झाला होता.
त्यानंतर ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता होती.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray to be in thane first time in eknath shinde home ground after shivsena crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ahmednagar ACB Trap | 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Chinchwad Bypoll Election | चिंचवडचा पुढील आमदार कोण? लक्ष्मण जगताप यांच्या भावाचं मोठे वक्तव्य

Must Read
Related News