Uddhav Thackeray | तुम्ही म्हणत होता ना सरकार पाडून दाखवा, आम्ही पाडले; आता बडबड बंद करा, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Uddhav Balasaheb Thackeray) आणि भाजपच्या (BJP) उमेदवारांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे – Uddhav Thackeray) वतीने दिवंगत आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपने स्थानिक पुढारी मुराजी पटेल (Muraji Patel) यांनी रिंगणात उतरविले आहे. आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही गटांनी अर्ज भरले असून, यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

 

अंधेरीची पोटनिवडणूक दोनही गटांसाठी आता प्रतिष्ठेची निवडणूक झाली आहे. कारण या महत्वाच्या निवडणुकीवर शिंदे यांच्या बंडाचे समर्थन जनता करते की नाही, हे ठरणार आहे. तसेच खरी शिवसेना म्हणून जनता कोणाला मान्यता देणार, याचा देखील अंदाज या निवडणुकीवरुन येणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दक्षिण मुंबईची जबाबदारी दिली आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काही राहिले नाही. राज्य गेले, मुंबई गेली.
आता दक्षिण मुंबईत देखील भाजपचाच खासदार निवडून येणार आहे. तसेच दिवंगत रमेश लटके आज हयात असते, तर ते शिंदे गटात असते, असे नारायण राणे म्हणाले. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे उद्धव ठाकरे सतत म्हणत होते. आता आम्ही ते पाडून दाखवले आहे. तेव्हा त्यांनी बडबड बंद करावी, अशा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

 

Web Title :- Uddhav Thackeray | we brought down the government now uddhav thackeray should stop talking criticism of narayan rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर