Uddhav Thackeray | ‘फडणवीसांचं ज्ञान तोडकं, मंत्रालयाच्या आसपासही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. फडणवीस यांचे ज्ञान इतकं तोडकं असेल मला माहिती नव्हतं. खरं तर ते मंत्रालयाच्या परिसरता फिरण्याच्या देखील कुवतीचे नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली. भाजपाचे नेते बबनराव पाचपुते (BJP Leader Babanrao Pacchpute) यांचे पुतणे साजन पाचपुते (Sajan Pacchpute) यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे.

जालन्याची जबाबदारी कोण घेणार?उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, महाराष्ट्रातलं तीन तिघाडी सरकार निर्घृणपणे काम करत आहे. न्याय हक्कांसाठी जो कुणी रस्त्यावर उतरलं तर आम्ही डोकी फोडून टाकू. घरात घुसून मारु. माता भगिनी, वयोवृद्ध काही बघणार नाही हाच संकेत या सरकारने जालना येथील घटनेतून (Jalna Lathi Charge) दिला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली. बारसूमध्येही (Barsu Protest) असाच अनुभव आला, त्याठिकाणी महिलांवर लाठीचार्ज केला. जे सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी (Hindutva) मानतं ते वारकऱ्यांवर लाठीमार कसा करु शकते? जालन्यात जे झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? सरकार पोलिसांवर जबाबदारी झटकणार, पोलीस म्हणणार लाठ्यांमुळे लागलं मग लाठ्यांवर जबाबदारी टाकणार का? असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

सरकार चालवण्यासाठी नालायक

जालन्यामध्ये लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिला? एक फुल आणि एक फुल, फडणवीस वेगळे काढले तरीही त्यांचं काम काय चाललंय? कारण पोलीस जर त्यांना जुमानता वागत असतील तर याचा अर्थ त्यांच्या प्रशासनावर कंट्रोल नाही. हे सरकार चालवण्याच्या कुवतीचे नाहीत, सरकार चालवण्यासाठी नालायक आहेत आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील निर्लज्ज सरकार आपल्याला उलथून टाकायचं आहे, असेही ते म्हणाले.

फडणवीसांच ज्ञान तोकडं असेल…

देवेंद्र फडणवीस यांचे ज्ञान तोकडं असेल मला वाटत नाही. कारण हा अधिकार केंद्राचा आहे. वटहुकूम सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) विरोधात राज्य सरकार काढायला लागलं तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आसपासही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत. घटनेचा त्यांनी काहीही अभ्यास केलेला नाही असंच यातून सिद्ध होते. घटना बदलण्याचे काम जे करणार आम्ही जे म्हणतोय त्याची सुरुवात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या बाबतीत तेच करुन दाखवलं. निकाल फिरवला.

गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे

जर देवेंद्र फडणवीसांना हे वाटत असेल की वटहुकूम का काढला नाही तर तुम्ही अधिवेशन घ्या
आणि तुम्ही काढा वटहुकूम असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.
या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
मुख्यमंत्र्यांचं पोलीस ऐकत नसतील तर त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MLA Rohit Pawar | प्रफुल्ल पटेलांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या दाव्यावर रोहित पवारांचे जोरदार प्रतिउत्तर; “आमच्याकडे शरद पवार…”

Pune Crime News | 50 लाखांची खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड